तेविसाव्या
राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याला मिळालेले
होते. पण या स्पर्धांच्या आयोजनावर होणारा प्रचंड खर्च लक्षात आल्यावर आर्थिक
कारणांमुळे त्याने आपले यजमानपद रद्द केले होते. त्यामुळे कालांतराने या
स्पर्धांच्या आयोजनासाठी स्कॉटलंडने तयारी दाखवली, मात्र त्यांचे आयोजन थोडक्यात करण्यात
येईल, असेही जाहीर केले.
ऑलिंपिक,
आशियाई क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या विश्वचषक स्पर्धांचं आयोजन
करून यजमान देश त्यातून आपल्या देशाविषयीची जगावर सकारात्मक छाप पाडण्यासाठी झटत
असतो. त्यासाठीचं साधन म्हणूनच या क्रीडा स्पर्धांचा वापर करून घेतला जात असतो. गेल्या
90 वर्षांपासून हे सतत दिसून आलेलं आहे. पण यंदाच्या स्पर्धांच्या आयोजनाच्यावेळी युनायटेड
किंगडमनं या प्रथेला छेद दिला आहे. सद्यपरिस्थितीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या
हेतूनं यंदाच्या स्पर्धा आटोपशीर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणूनच
हॉकी, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बीच व्हॉलिबॉल, पाण्यात सूर मारणे (diving), क्रिकेट, रोड सायकलिंग, माऊंटन बायकिंग, रीदमिक
जिमनॅस्टिक्स, रग्बी सेव्हन्स, स्व्कॅश, टेबल टेनिस, ट्राएथलॉन आणि कुस्ती यासारख्या
महत्वाच्या क्रीडा प्रकारांचा
यंदाच्या ग्लासगो क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
ग्लासगो
स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्समध्ये
1500 मीटर ट्रॅक स्पर्धेच्या जागी एक मैलाची धावण्याच्या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे.
हा क्रीडा प्रकार राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 1966
नंतर पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आला आहे.
राष्ट्रकुलाचे सदस्य असलेल्या 74 देशांमधील सुमारे तीन हृजार
क्रीडापटू दहा क्रीडा प्रकारांमधून आपले कौशल्य पणाला लावतील. ग्लासगोमध्ये होत
असलेल्या राष्ट्रकूल आणि पॅरास्पर्धांमध्ये मिळून भारताचे 124 क्रीडापटूंचे पथक
सहभागी होत आहे. मात्र भारताला हमखास पदकं मिळवून देणाऱ्या हॉकी, कुस्ती,
बॅडमिंटन, नेमबाजी, क्रिकेट क्रीडा प्रकारांचा समावेश यंदाच्या स्पर्धांमध्ये
करण्यात आलेला नाही. त्यामुळं भारताला आता ॲथलेटिक्स, मुष्टियुद्ध आणि भारतोलन या
क्रीडा प्रकारांवरच पदकांसाठी अवलंबून राहावं लागणार आहे.
स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे चौथ्यांदा आयोजन होत आहे.
यंदा ग्लासगोमध्ये होत असलेल्या स्पर्धेचा फिनी हा शुभंकर आहे. स्कॉटलंडचा राष्ट्रीय
प्राणी असलेल्या एकशिंगी अश्वावरून फिनीची संकल्पना स्वीकारलेली आहे.
ग्लासगो स्पर्धांसाठी निवडण्यात आलेलं बोधचिन्ह ग्लासगोशी संबंधित 3 गोष्टींचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामध्ये इंग्रजी V अक्षराप्रमाणं तीन रंगबिरंगी आकृत्या आहेत. त्यातील एक आकृती ग्लासगोतून वाहणाऱ्या क्लाइड नदीचं, दुसरी आकृती क्लाइड नदीवरील कमानी पुलाचं, तर तिसरी ग्लासगोमधल्या ऐतिहासिक खूण असलेल्या फिनिस्टन क्रेनचं प्रतिनिधित्व करत आहेत.

👍
उत्तर द्याहटवाVery nice details informative write up . 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवा👌👌👌
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवा