![]() |
| शीन-ए-शेन (शान) खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचा शुभंकर |
आपल्याकडे बर्फावरच्या म्हणजेच
हिवाळी क्रीडाप्रकारांबद्दल खूप अनभिज्ञता आहे. भारताचा हिवाळी ऑलिंपिक आणि इतर हिवाळी
आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधला सहभाग नगण्य असतो. एखादाच भारतीय या स्पर्धांमध्ये
सहभागी होत असतो. त्यातच आपल्याकडं क्रीडाप्रकार म्हणजे फक्त क्रिकेट हेच वर्षानुवर्ष
मनावर बिंबवलं जात होतं. या सर्व कारणांमुळं इतर क्रीडाप्रकारांकडे, आणि हिवाळी क्रीडाप्रकारांकडे
तर जास्तच दुर्लक्ष होत राहिलं आहे. या परिस्थितीवर मात करून हिवाळी
क्रीडाप्रकारांबाबत जागृती निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि
त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भारतीय क्रीडापटू घडावेत या हेतूंनी 2020 पासून
सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
यावळी
20 ते 26 जानेवारीदरम्यान या स्पर्धा दोन भागांमध्ये, लेह आणि गुलमर्गमध्ये, पार पडणार आहेत. लडाखमधील स्पर्धांमध्ये 1000 हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक
अधिकारी सहभागी झालेले आहेत. नवांग दोरजे स्तोबदान (एनडीएस) स्टेडियम, आर्मी रिंक
आणि गोठलेला गुपुख तलाव या ठिकाणी सामने होत आहेत.
लेहमध्ये
स्पीड स्केटिंग (शॉर्ट-ट्रॅक आणि लाँग ट्रॅक) आणि आईस हॉकीचे सामने होत आहेत. त्यामध्ये
472 खेळाडू भाग घेत आहेत. फिगर स्केटिंग या ऑलिंपिक क्रीडाप्रकाराचा यंदा
पहिल्यांदाच खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं तो एख
कुतुहलाचा विषय ठरणार आहे.
लेहमधील
स्पर्धांमध्ये खेळाडू आणि त्यांच्या सहायक कर्मचारीवर्गाला शून्याखालील तापमान आणि
कमी ऑक्सिजन अशा उंच पर्वतीय हवामानातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा
लागणार आहे. या टप्प्यात एकूण 17 सुवर्णपदकांसाठीचे सामने होणार असून, त्यांच्यापैकी
15 सुवर्णपदकं स्पीड स्केटिंग क्रीडाप्रकारात दिली जाणार आहेत.
या
स्पर्धेचा दुसरा भाग गुलमर्गमध्ये या वर्षीच, पण नंतर होणार असून तिथं Ski-mountaineering, Alpine
Skiing, Nordic Skiing, Snowboard या
क्रीडाप्रकारांचे सामने होणार आहेत.
(फोटो-पीआयबी)


छान माहिती
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअनेकांना या बद्दल माहिती नसते
उत्तर द्याहटवातुम्ही चांगली माहिती दिलीत.
सहमत
हटवाधन्यवाद
हटवामाहितीपूर्ण हिवाळी क्रीडा स्पर्धेविषयी उपयुक्त लेख आहे.
उत्तर द्याहटवा