Strength on the High Seas

 

भा. नौ. पो. तमाल

INS Tamal

भा. नौ. पो. तमाल ही अत्याधुनिक स्टिल्थ लढाऊनौका रशियातील कलिनिनग्रादमधल्या यंतार गोदीत 1 जुलै 2025 ला भारतीय नौदलात सामील करण्यात आली. या युद्धनौकेला परदेशात बांधली गेलेली भारतीय नौदलाची शेवटची युद्धनौका म्हणून संबोधलं जात आहे.

प्रकल्प 1135.6 (क्रिवाक वर्ग) मालिकेतील ही आठवी आणि तुशील वर्गातील दुसरी बहुपयोगी स्टिल्थ लढाऊनौका आहे. ही युद्धनौका म्हणजे समुद्रावर संचार करणारा अतिशय अभेद्य किल्लाच आहे. नाविक युद्धतंत्रातील निळ्या पाण्यावरील मोहिमांच्या आकाश, सागरीपृष्ठ, पाण्याखाली आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक या चारही आयामांमध्ये सक्षमपणे कार्यरत राहील असं तमालचं आरेखन करण्यात आलं आहे.

तमाल भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्याचा भाग असणार आहे. तोफखाना आणि क्षेपणास्त्र युद्धतंत्रातील तज्ज्ञ असलेले कॅप्टन श्रीधर टाटा हे तिचे पहिले कमांडर आहेत.

सामिलीकरण समारंभ

  • मिखाइइलेव बबिच (रशियन संघाच्या लष्करी तांत्रिक सहकार्यासाठीच्या संघीय सेवेचे उपनिदेशक) यांनी दोन्ही देशांच्या नौदलांमधील सागरी तंत्राज्ञानविषयक सहकार्य आणि त्याच्या भविष्यावर भाष्य केले.
  • व्हाईस डमिरल आर. स्वामिनाथन (सीडब्ल्यूपीअँडए)- तमालचे सामिलीकरण हे भारत आणि रशिया यांच्यातील व्यूहात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. भारत-रशिया व्यूहात्मक भागीदारी काळाच्या कसोटीवर उतरलेली आहे. गेल्या 65 वर्षांमध्ये भारतीय नौदलासाठी रशियात बांधण्यात आलेली ही 51वी नौका आहे.

भा. नौ. पो. तमालविषयी

  •    ब्रीदवाक्य- सर्वत्र सर्वदा विजया
  •  युद्धनौकेवर दूर पल्ल्याची स्वनातीत ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हमसा-एनजी सोनार यंत्रणा बसवलेली आहे.
  • श्टिल-1 ही रशियन शस्त्रास्त्र प्रणाली बसवलेली आहे. यावर तोफा आणि पाणतीरही बसवलेले आहेत.
  •  रशियन आणि भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक दूरसंचार आणि नेटवर्क आधारित यंत्रणा यावर एकीकृत करण्यात आलेल्या आहेत.
  •   सागरी प्रदेशातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डव्हांस्ड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि डव्हांस्ड ईओ/आयआर यंत्रणा तमालवर बसवलेल्या आहेत.
  •   यावरच्या बहुमुखी युद्धनियोजन यंत्रणेशी सर्व शस्त्रास्त्रे आणि संवेदक एकीकृत करण्यात आल्यामुळं तमाल अत्यंत प्रभावी युद्धनौका बनलेली आहे.
  • तमालवर 100 मिमीची सुधारित तोफ, 30 मिमीची सीआयडब्ल्यूएस ही तोफ, त्वरित हल्ल्यासाठी पाणबुडीविरोधी रॉकेट्स बसवलेली आहेत.
  • ही ताशी 30 सागरी मैल वेगानं संचार करू शकते.
  • ही 125 मी. लांब, 15.2 मी. रुंद आणि 3900 टन वजनाची आहे.
  • यावर कामव-28 आणि कामव-31 ही पाणबुडीविरोधी आणि हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी हेलिकॉप्टर्स ठेवलेली आहेत.
  • आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी हिच्यावर स्वयंचलित यंत्रणा बसवलेली आहे.
  • तमालवर 250 नौसैनिक आणि 26 अधिकारी कार्यरत असतात.

INS Tamal (F71) state of the art stealth frigate has been commissioned in to the Indian Navy at Yantar Shipyard, Kaliningrad, Russia on 1st July 2025. This warship is refered as ‘the last foreign built warship of the Indian Navy’.

INS Tamal is the eighth multi-role stealth frigate in the series of Project 1135.6 (Krivak-class) and the second of the additional follow-on Tushil class frigate. She is a formidable moving fortress at sea and designed for blue water operations across the spectrum of naval warfare in all four dimensions i.e. air, surface, underwater and electromagnetic.

INS Tamal will be a part of Western Fleet of the Indian Navy. She is commanded by Capt. Sridhar Tata, a gunnery and missile warfare specialist. 

The commissioning ceremony

·         Mr. Mikhaeelev Babich (Deputy Director General of Federal Service for Military Technical Cooperation of the Russian Federation) spoke about the maritime technological cooperation between the Indian and Russian navies and its growing future trajectory.

·         Vice Admiral R Swaminathan, CWP&A: Commissioning of INS Tamal is a symbol of the strategic partnership between India and Russia. The Indo-Russian strategic partnership has stood the test of time, with INS Tamal being the 51st ship being produced under this collaborative effort in the past 65 years.

 

About INS Tamal

·         Motto – Sarvatra Sarvada Vijaya

·   The warship is equipped with BrahMos long range supersonic cruise missile as well as Humsa-NG Sonar system.

·         She is equipped with Russian weapon systems including the vertical launched surface to air missile Shtil-1. She is also equipped with artillery weapons and torpedoes.

·         She is an amalgamation of Indian and Russian technologies with a host of state of the art communication and network centric operational capabilities.

·         Advanced electronic warfare suite and advanced EO/IR systems adds ears and eyes to this warship.

·         The highly versatile combat management system fuses all weapons and sensors into an effective fighting machine.

·   She has improved 100 mm gun, standard 30 mm CIWS, urgent-attack anti-submarine rockets.

·         She can cruise at 30 knots per hour speed.

·         Length 125 m, width 15.2 m, weight 3900 tons.

·         The warship can carry Kamov-28 and Kamov-31 upgraded Anti-submarine and Airborne Early Warning helicopters.

·         She has been equipped with complex automated systems for nuclear, biological and chemical defence.

·  INS Tamal is manned by a crew of about 250 sailors and 26 officers.

Tushil-class frigate INS Tushil

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा