![]() |
राष्ट्रपती निकेतन |
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये असलेलं राष्ट्रपती निकेतन हे राष्ट्रपतींच्या विश्रांतीस्थानांपैकी एक आहे. 20 जून 2025 ला याचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं असून 24 जून 2025 पासून इथली वास्तू आणि परिसर सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला होत आहे.
राष्ट्रपती तसेच राष्ट्रपती भवनाच्या
वारशाबाबत नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी
राष्ट्रपतींच्या विविध इमारती सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या जात
आहेत. या उपक्रमांतर्गत 2023 पासून नवी दिल्लीमधले राष्ट्रपती भवन, हैदराबादमधील
राष्ट्रपती निलायम आणि सिमल्यातील मशोब्रा इथलं राष्ट्रपती निवास सर्वसामान्यांना
पाहण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस खुलं केलं जातं. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारी
2025 पासून राष्ट्रपती भवनाच्या दर्शनी भागात होणाऱ्या Change of Guard समारंभाचे स्वरुपही बदलण्यात आले
आहे.
डेहराडूनमधलं राष्ट्रपतींच्या विश्रांतीचं
स्थान म्हणजेच राष्ट्रपती निकेतन 186 वर्षे जुनं असून ते 21 एकर क्षेत्रात
विस्तारलेलं आहे. आधी राष्ट्रपती आशियाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूचं
नुतनीकरणानंतर राष्ट्रपती निकेतन असं नामकरण करण्यात आलं आहे. हा परिसर
राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्या घोड्यांच्या
उन्हाळी मुक्कामासाठी वापरला असतो. आता या वारसा इमारतीत वास्तूच्या समृद्ध
वारशाची झलक दाखवणाऱ्या निवडक कलाकृतींच्या संग्रहाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे.
त्याचबरोबर इथं राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या (राष्ट्रपती अंगरक्षक दलावरील माझ्या लेखाची लिंक) घोड्यांचे तबेले आणि घोडे
पाहण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या वास्तू परिसरातील लिली तलाव, रॉकरी तलाव,
गुलाब उद्यान आणि पेर्गोला पाहण्याची संधीही मिळणार आहे.
या परिसरातच 132 एकरचे राष्ट्रपती उद्यान उभारण्यात येत असून ते ecological garden असणार आहे. ते उद्यान पुढच्या वर्षापासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहे. या उद्यानाचं नियोजन करताना ते पर्यावरणाच्या विविध पैलूंचा अंतर्भाव असलेलं आणि मनोरंजनात्मक मूल्य जपणारं असेल. त्या अनुंगानं या उद्यानांतर्गत विविध संकल्पनाधारित उद्यानेसुद्धा असतील. यात एका फुलपाखरांच्या उद्यानाचाही समावेश असेल. याशिवाय या परिसरात एक नयनरम्य तलाव, पक्षीनिवास आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागाही विकसित केली जाणार आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्र, पादचाऱ्यांसाठी खास मार्गिका, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅकसुद्धा उभारले जाणार आहेत. या उद्यान परिसरात जलसंवर्धन व्यवस्थेचाही अंतर्भाव असेल. तसेच मोकळ्या जागेत शिकण्याचा अनुभव देणाऱ्या व्यवस्थाही उभारल्या जाणार आहेत. या सगळ्यातून पर्यावरणीय जागृती तसंच सक्रीय जीवनशैलीला चालना देण्यासोबतच कौटुंबिक संवादाला निसर्गाशी एकरुप करण्याचा हेतू आहे.
👍
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती पूर्ण लेख
उत्तर द्याहटवा