USAID बंद!

 

      USAID (United States Agency for International Development) हिचं स्वतंत्र संस्था म्हणून अस्तित्व संपुष्टात आणण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी नुकताच घेतला आहे. अमेरिकन सरकारच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी ट्रंप यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचा हा एक भाग आहे. मात्र या निर्णयावर अमेरिकेबरोबरच जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रंप यांनी त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या पहिल्या कार्यकाळापासून स्वीकारलेल्या America First या भूमिकेशी अनुकूल असंच हे धोरण आहे. पण त्यांच्या या निर्णयाचा विपरीत परिणाम USAID च्या मार्फत सहाय्य मिळवत असलेल्या देशांबरोबरच अमेरिकेच्या हितसंबंधांवरही होऊ शकतो.

      राष्ट्रपती ट्रंप यांच्या मते, USAID हा अमेरिकेवर एक प्रकारचा बोजा आहे. जगाच्या विकासाची चिंता अमेरिकेनं करत बसण्याची गरज नाही. त्यापेक्षा अमेरिकेनं स्वत:च्या विकासाकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा असा इतर देशांच्या विकासासाठी वापर करण्याच्या विरोधातही ट्रंप यांनी पूर्वीपासून भूमिका घेतलेली आहे. ट्रंप यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच अमेरिकेकडून परदेशांना करण्यात येणी मदत 90 दिवसांसाठी थांबवण्याचा कार्यकारी आदेश काढला. त्यानंतर लगेचच त्यांनी USAID बाबतही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

USAID चे स्वतंत्र संस्था म्हणून अस्तित्व संपवून तिला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आणले जाणार आहे. त्यामुळं ट्रंप यांच्या निर्णयानंतर 3 फेब्रुवारी 2025 ला USAID चं कार्यालयही बंद करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती ट्रंप यांच्या या निर्णयानंतर USAID मधील कर्मचारीवर्ग 10,000 वरून 300 पर्यंत कमी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून USAID च्या अनेक कंत्राटदारांना लगेचच विनावेतन रजेवर पाठवण्यात आलेलं आहे, तर काहींची सेवा तातडीनं संपवण्यात आलेली आहे. तरीही ी स्वतंत्र संस्था बंद करणं राष्ट्रपतींच्या एखाद्या निर्णयाद्वारे शक्य नसून त्या निर्णयाला अमेरिकन काँग्रेसची मंजुरी मिळणं आवश्यक आहे, असं विरोधी डेमोक्रॅटिक पक्षानं म्हटलं आहे.

      अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं एक साधन बनलेल्या या संस्थेच्या माध्यमातून जगातील विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक, मानवीय कार्यक्रमांना अमेरिकेकडून सहाय्य पुरवलं जात आलं आहे. USAID कडून मिळणाऱ्या मदतीवर जगभरातील अनेक देशांमधील जनता विसंबून आहे. आज जवळपास 2 कोटी एचआयव्हीबाधितांना USAID च्या माध्यमातून जीवनरक्षक मदत पुरवली जात आहे. तरीही USAID साठीच्या आर्थिक तरतुदीचा वाटा अमेरिकेच्या अर्थसंकल्पाच्या जेमतेम 1 टक्क्यापर्यंत राहिला आहे.

USAID

स्थापना

Creation

  •    अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे 1961 मध्ये या निधीची स्थापना केली होती.
  •          3 नोव्हेंबर 1961 पासून USAID संस्था अस्तित्वात आली.
  •          परदेशांना मदत करणाऱ्या त्यावेळच्या वेगवेगळ्या संस्था आणि कार्यक्रमांना USAID अंतर्गत एकत्र आणण्यात आलं.

·         The Congress passed the Foreign Assistance Act, 1961. Then President John. F. Kennedy created the United States Agency for International Development by executive order in 1961.

·         USAID came to existence on 3 November 1961.

·         It brought together several existing foreign assistance organizations and programs.

उद्देश

Objectives

  •          अमेरिकेच्या भागीदारांना स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांना स्वत:चा विकास साध्य करण्याइतपत सक्षम बनवणे.
  •           हे साध्य होण्यासाठी संघर्ष, अस्थैर्य, सीमेपलिकडील गुन्हेगारी आणि इतर सुरक्षाविषयक धोके कमी करणे.
  •          साथीच्या रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध घालणे.

·        Support partners to become self-reliant and capable of leading their own development journeys.

·        For achieving this reduce the risk of conflict, instability, transnational crime and other security threats.

·        Prevent the spread of pandemic disease.

USAID विषयी..

About USAID

  •      USAID जगातील 130 देशांमध्ये कार्यरत आहे. तेथील समाजाच्या विकासात या संस्थेने महत्वाचा वाटा उचलला आहे.

·         USAID is working in around 130 countries.

  •          USAID ने जगभरात अमेरिकेविषयी चांगले मत निर्माण केले आहे. तसेच लोकशाही, प्रशासन आणि शांततेला बळ दिले आहे.

·         USAID demonstrates America’s good will around the world and advances democracy, governance, and peace.

  •         70च्या दशकात USAID च्या कार्याचं क्षेत्र तांत्रिक आणि भांडवली सहाय्याबरोबरच अन्न आणि पोषण, शिक्षण आणि मानव संसाधन विकास यासारख्या क्षेत्रांमध्येही विस्तारलं.

·         In the 1970s USAID also started working in the fields of food and nutrition, population control, health, education and human resource development. It was earlier working only in areas of technical and capital assistance.

  •      90च्या दशकात USAID नं शाश्वत विकासाला सर्वाधिक महत्व दिलं.

·         In the 1990s USAID gave its top priority to the sustainable development.

  •          विविध देशांमध्ये बाजाराभिमुख, खुल्या आर्थिक व्यवस्थेबरोबरच कार्यशील लोकशाह्यांच्या प्रस्थापनेसाठी USAID चे विविध कार्यक्रमांची मदत झाली.

·         Such programmes helped in establishing functioning democracies with open, market-oriented systems.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा