![]() |
सुखोई-30 एमकेआय आणि आयएल-78 एमकेआय विमानं प्रातिनिधिक फोटो. (फोटो-पीआयबी) |
भारतीय हवाईदलाच्या चार रफाल लढाऊ विमानांनी काही दिवसांपूर्वी हिंदी महासागर क्षेत्रात लांब पल्ल्याची विशेष चाचणी मोहीम राबवली होती. त्या मोहिमेतून रफाल विमानांच्या सागरी क्षेत्रातील लढाऊ क्षमतांचा आढावा घेतला गेला. त्यानंतर काही दिवसांनी सुखोई-30एमकेआय विमानांनीही अशीच एक दीर्घपल्ल्याची सागरी चाचणी मोहीम राबवली होती. या दोन्ही मोहिमांविषयी संक्षिप्त माहिती हवाईदलानं नंतर प्रसिद्ध केली होती.
रफाल आणि सुखोई विमानांनी हिंदी महासागर
क्षेत्रात राबवलेल्या या मोहिमा विशेष महत्वाच्या समजल्या जात आहेत. भारतीय हवाईदल
हिंदी महासागर क्षेत्रामधलं सर्वात मोठं हवाईदल आहे. त्यातच हे क्षेत्र भारताच्या
राष्ट्रहितांच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. भारताचे शेजारी
आणि विस्तारित सागरी क्षेत्रातले शेजारी देश यांच्यातला धोरणात्मक दुवा म्हणून हिंदी
महासागर भूमिका बजावत आहे. या प्रदेशामधली भारताची भूमिका, ‘सागर’ अर्थात, “या
प्रदेशातल्या सर्वांसाठी
सुरक्षा आणि विकास” (Security and Growth for All in the Region/ SAGAR) या त्याच्या दृष्टिकोनातून स्पष्ट
होते.
या पार्श्वभूमीवर रफाल विमानांनी हिंदी
महासागर क्षेत्रातील आपल्या क्षमतांची चाचणी घेण्याच्या हेतूनं सहा तासांची मोहीम
राबवली होती. त्यानंतर सुखोई विमानांनी भारताच्या दोन्ही बाजूंच्या सागरी
भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित केलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ला चढवला. ती
माहीम सुमारे आठ तास चालली होती. या दोन्ही मोहिमांनंतर हवाईदलानं या चाचण्या
यशस्वी झाल्याचं जाहीर केलं.
![]() |
रफाल विमान/ प्रातिनिधिक फोटो. (फोटो-पीआयबी) |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा