नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपल्यावर 25 जुलैला सकाळी सव्वादहा वाजता नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडेल. देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीचा हा शपथविधी समारंभ अतिशय गांभीर्यपूर्ण, शिस्तबद्ध, दिमाखदार आणि पाहण्यासारखा असतो. राष्ट्रपती भवनात पार पडत असलेल्या विविध परंपरागत, दिमाखदार समारंभांपैकी हा एक समारंभ असतो.
राष्ट्रपतींच्या शपथ समारंभासाठी राष्ट्रपती भवनाचे मुख्य प्रांगण सजून तयार असते. राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांच्या जवळ अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आसनव्यवस्था केलेली असते. ती व्यवस्था दोन भागांमध्ये विभागलेली असते आणि त्यांच्या मधोमध विद्यमान आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींसाठीचा सलामी मंच उभा केला जातो. त्या मंचाच्या शेजारी राष्ट्रपतींचे दोन अंगरक्षक समारंभासाठीच्या खास गणवेशात उभे असतात. असेच अंगरक्षक राष्ट्रपती भवनाच्या 32 पायऱ्यांवरही हातात भाले घेऊन उभे राहतात. या सलामी मंचाच्या समोर राष्ट्रपती अंगरक्षक दलातील 46 घोडेस्वार समारंभासाठीच्या पारंपारिक गणवेशात, लाल-पांढऱ्या पताका लावलेले भाले हातात घेऊन विद्यमान आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती येण्याची प्रतीक्षा करत असतात. त्यावेळी राष्ट्रपती अंगरक्षक रेजिमेंटचा प्रमुख (कर्नल) बरोबर मध्यभागी घोड्यावर स्वार होऊन सज्ज असतो. त्याच्या थोडं मागे राष्ट्रपती अंगरक्षक रेजिमेंटचा उपप्रमुख आणि त्यांच्या आणखी थोडं मागं राष्ट्रपती अंगरक्षक रेजिमेंटचा ध्वजवाहक आणि तुतारीवाहक घोडेस्वारही सज्ज असतो. त्या तुतारीवाहकाच्या हातात अजून विद्यमान राष्ट्रपतींनी प्रदान केलेलीच चंदेरी तुतारी आणि बॅनर असतात. कारण अंगरक्षकांना काही दिवसांनंतर पार पडणाऱ्या अन्य एका विशेष समारंभात नव्या राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि बॅनर दिले जाणार असते. जुलै असल्यामुळे त्या अंगरक्षकांनी त्यांचा खास समारंभासाठीचा उन्हाळी गणवेश – पांढरा झगा – परिधान केलेला असतो. असेच घोडेस्वार अंगरक्षक राष्ट्रपती भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीही उभे असतात. प्रवेशद्वाराच्या पुढे संसद भवनापर्यंत जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना तिन्ही दलांमधील जवान समारंभासाठीच्या खास पोशाखात उभे असतात. हा विशेष महत्वाचा समारंभ असल्यामुळे या सगळ्या बाबी अचूक असतील याकडे लक्ष पुरवले जात असते.
(फोटो-पीआयबी) |
(फोटो-पीआयबी) |
विजय चौकातून संसद भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ उपराष्ट्रपती, लोक सभेचे अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीशांकडून या दोघांचे स्वागत केले जाते. तिथे पुन्हा चंदेरी तुतारी वाजवून राष्ट्रपती अंगरक्षकांकडून राष्ट्रपतींना सलामी दिली जाते. यावेळीही नवनिर्वाचित राष्ट्रपती विद्यमान राष्ट्रपतींच्या मागे उभे राहतात. सलामीनंतर दोघेही अन्य मान्यवर आणि ADC सह समारंक्षपूर्वक संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात येतात, तेव्हा त्यांना राष्ट्रपती अंगरक्षकांकडून बिगुल वाजवून मानवंदना दिली जाते.
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणारा शपथविधी (फोटो-पीआयबी) |
राष्ट्रगीताने या
शपथविधीची सुरुवात झाल्यावर लगेच राज्य सभेचे महासचिव भारत निवडणूक आयोगाने जारी
केलेल्या निर्वाचित राष्ट्रपतींच्या घोषणेचे वाचन करतात. त्यानंतर भारताचे
सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. शपथ घेतल्यानंतर निर्वाचित राष्ट्रपती विद्यमान राष्ट्रपतींच्या आसनावर जाऊन बसतात. म्हणजेच ते आपापल्या आसनांचे आदानप्रदान करतात. त्यानंतर नव्या राष्ट्रपतींना सैन्याकडून 21 तोफांची सलामी दिली जाते. या तोफांचे आवाज मध्यवर्ती कक्षापर्यंत पोहचत असतात. तोफांच्या सलामीनंतर राज्य सभेचे महासचिव नव्या राष्ट्रपतींच्या पदग्रहणाची
उद्घोषणा करतात आणि ती उद्घोषणा भारताच्या राजपत्रात (Gazette of India) प्रकाशित करण्यात येत असल्याचीही
घोषणा करतात. या समारंभासाठी सजलेल्या मंचावर दोन्ही राष्ट्रपतींच्या शेजारी
उपराष्ट्रपती, लोक सभा अध्यक्ष आणि सरन्यायाधीश बसलेले असतात. त्याचवेळी ADC
आणि राष्ट्रपती अंगरक्षकही या
सर्वांच्या मागे आपल्या पारंपारिक गणवेशात उभे राहून समारंभाची शोभा वाढवत असतात.
संसद भवनातील शपथविधीनंतर आजी-माजी राष्ट्रपतींचा राष्ट्रपती भवनाकडे परतणारा ताफा (फोटो-पीआयबी) |
खास बग्गीतून येणारे आजी-माजी राष्ट्रपती (फोटो-पीआयबी) |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा