सहजच गुगलवर शोधता शोधता...

 


      अलीकडेच सहजच गुगलवर माझं नाव टाकून शोधलं. पाहुया म्हटलं काय-काय येतंय. माझे विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले लेख त्यात दिसू लागले. पण त्यापैकी एका search result नं माझं लक्ष विशेष वेधून घेतलं. माझाच लेख होता तो; पण हा कुठं आलाय असं चकीत होऊन पाहू लागलो. ती लिंक उघडून पाहिल्यावर चित्र स्पष्ट होऊ लागलं.

      अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या Transportation Research International Documentation च्या Transportation Research Board ने माझा लेख वाहतूक संशोधकांना अभ्यासासाठी आपल्या ग्रंथालयात ठेवला होता. तो लेख होता काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला भोपाळ शताब्दी एक्सप्रेसवरचा माझा लेख. तो लेख मी रेल्वे मंत्रालयाच्या Indian Railways या मासिकात लिहिला होता. तोच लेख या ग्रंथालयाने स्वत:च्या ग्रंथालयात ठेवला आहे. या ग्रंथालयात Indian Railways या मासिकात प्रकाशित झालेले माझे 5 लेख उपलब्ध करून दिलेले आहेत. मग अजून उत्सुकता वाढू लागली. ती लिंक उघडून पाहिल्यावर एक बाब लक्षात आली की, या बोर्डाने माझे लेख दुसऱ्या एका ठिकाणाहून मागवून घेतले होते. ते ठिकाण होतं अमेरिकेतील शिकागोच्या जवळ एव्हँस्टन येथील Northwestern University ची Transportation Library.

      त्यानंतर मग Northwestern University च्या Transportation Library चं संकेतस्थळ बघू लागलो, तेव्हा समजलं की, हा एकच नाही, तर 2006 पासून आजपर्यंत Indian Railways मासिकात प्रकाशित झालेले माझे सात लेख या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. फेब्रुवारी-2022 च्या Indian Railways मासिकात प्रकाशित झालेला माझा Six Decades of Deccan Express हा अगदी अलीकडचा लेखही Northwestern University च्या Transportation Library त उपलब्ध झालेला आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा