दिन विशेष - एप्रिल

एप्रिल दिन विशेष

आंतरराष्ट्रीय

  • 2 एप्रिल – जागतिक स्वमग्नता (Autism) जागृती दिन, आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन
  • 4 एप्रिल – खाणकामाविषयी जागृती आणि मदतीसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन
  • 5 एप्रिल – सद्सद्विवेकासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International day of Conscience)
  • 6 एप्रिल – विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन
  • 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन, रवांडातील 1994 मधील तुत्सींविरोधातील जनसंहारासंबंधीचा मनन दिन (International day of Reflection on the 1994 Genocide against the Tutsi in Rwanda)
  • 10 एप्रिल – जागतिक होमेओपॅथी दिन, जागतिक वातावरण दिन
  • 12 एप्रिल – मानवी अवकाश उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिन
  • 14 एप्रिल – सांस्कृतिक एकता दिन (भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि मालदिवमध्ये), जागतिक चगास विकार दिन (World Chagas Disease Day)
  • 17 एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन
  • 18 एप्रिल – जागतिक वारसा दिन
  • 20 एप्रिल – चिनी भाषा दिन, जागतिक अनाथ दिन
  • 21 एप्रिल – जागतिक कल्पकता आणि नवाचार दिन
  • 22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन
  • 23 एप्रिल – जागतिक पुस्तक व रचनास्वायत्त (कॉपीराईट) दिन, संयुक्त राष्ट्रांचा भाषा दिन (लेखक शेक्सपियर यांचा जन्मदिन), इंग्रजी भाषा दिन, स्पॅनिश भाषा दिन
  • 24 एप्रिल – शांततेसाठी बहुस्तरीयवादाचा आणि राजनयाचा आंतरराष्ट्रीय दिन, प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठीचा जागतिक दिन
  • 25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिन, प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय दिन
  • 26 एप्रिल – जागतिक बौद्धिकसंपदा अधिकार दिन, आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृतिदिन
  • 28 एप्रिल – कामाच्या छिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिन
  • 29 एप्रिल – आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
  • 30 एप्रिल – आंतरराष्ट्रीय जॅझ दिन
  • एप्रिलचा चौथा गुरुवार - International Girls in ICT Day

 

आंतरराष्ट्रीय सप्ताह

  • एप्रिलचा शेवटचा आठवडा – जागतिक लसीकरण सप्ताह

राष्ट्रीय

  • 1 एप्रिल – ओडिशा दिन
  • 5 एप्रिल – राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय नौकानयन दिन, राष्ट्रीय समता दिन (बाबू जगजीवनराम जयंती)
  • 9 एप्रिल – जलसंधारण दिन, शौर्य दिवस (केंद्रीय राखीव पोलीस दल)
  • 10 एप्रिल – हानिमान दिन
  • 11 एप्रिल – महिला सुरक्षा दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन (कस्तुरबा गांधी जयंती)
  • 13 एप्रिल – राजौरी दिवस
  • 14 एप्रिल – अग्निशमन सेवा दिन, राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), राष्ट्रीय विधी दिवस, कस्टम दिवस
  • 21 एप्रिल – नागरी सेवा दिन, सचिवांचा दिवस
  • 24 एप्रिल – राष्ट्रीय पंचायतराज दिन

 

राष्ट्रीय सप्ताह

  • 1 ते 7 एप्रिल – अंधत्व प्रतिबंध सप्ताह
  • 7 ते 14 एप्रिल – हातमाग सप्ताह
  • 10 ते 16 एप्रिल – रेल्वे सप्ताह
  • 14 ते 20 एप्रिल – राष्ट्रीय अग्निसेवा सप्ताह

 

महाराष्ट्र

  • 11 एप्रिल – शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले जयंती)

टिप्पण्या