8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस.
याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय
हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून
ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही
अशीच भूमिका बजावत राहील. हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे
8 ऑक्टोबरला हिंदन हवाईदल स्थानकावर मुख्य आणि दिमाखदार समारंभ पार पडला.
केवळ
भारतातील नाही, तर अन्य देशांमधील नैसर्गिक आपत्तींच्या काळातही भारतीय हवाईदल
तातडीने मदत पोहचवत आहे. 2004 मध्ये अमेरिकेतील न्यू ऑर्लिंस राज्यात आलेल्या
कॅटरिना चक्रीवादळानंतर तेथील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. अशा वेळी
मदतसाहित्य घेऊन तेथे पोहचलेले पहिले विदेशी विमान भारतीय हवाईदलाचे आयएल-76 एमडी
हे होते.
![]() |
सूर्यकिरण टीम. |
सारंग टीम. |
आज भारतीय हवाईदलात रफालसारखी मध्यम पल्ल्याची
अत्याधुनिक लढाऊ विमाने;
एमआय-17 व्ही-5, चिनूक आणि अपाचे यांसारखी हेलिकॉप्टर्स; आकाश, ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे; रडार अशी विविध प्रकारची साधनसामग्री
सामील झाली असून येत्या काळात 114 मध्यम पल्ल्याची बहुउद्देशीय लढाऊ विमाने, हलकी
हेलिकॉप्टर्स, एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा, सी-295 लहान मालवाहू विमाने हवाईदलाला
मिळणार आहेत.
जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि व्यावसायिकतेला महत्व देणारे भारतीय हवाईदल आज हिंदी महासागर क्षेत्रातील सर्वात प्रबळ हवाईदल आहे. शीतयुद्धोत्तर कालखंडात भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार त्याच्या भौगोलिक सीमेच्याही बराच पलीकडेपर्यंत झालेला आहे. परिणामी पहिला प्रतिसाद देणारा (First Responder) या नात्याने आपल्या हवाईदलावरील जबाबदारी वाढलेली असून त्याची कार्यकक्षा मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. ही विस्तृत जबाबदारी पार पाडण्यासाठी हवाईदलात सुखोई-30 एमकेआय, आयएल-78 एमकेआय (टँकर), सी-17 ग्लोबमास्टर-3, एवॅक्स यासारखी विविध विमाने-यंत्रणा सामील केल्या गेल्या आहेत. या सगळ्या साधनसामग्रीमुळे भारतीय हवाईदलाची व्यूहात्मक पोच वाढलेली आहे. म्हणूनच भारतीय हवाईदल आता केवळ आपल्या हवाईसीमांचे संरक्षण करणारे हवाईदल राहिलेले नसून ते व्यूहात्मक हवाईदल म्हणून ओळखले जात आहे.
![]() |
अलास्कामधील रेड फ्लॅग-16 युद्धसरावात सहभागी झालेले भारतीय हवाईदल. (सर्व फोटो-पीआयबी) |
सध्या हवाईदलाकडे मर्यादित सामग्री उपलब्ध आहे. तरीही हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून हिंदी महासागरापर्यंत आणि अरबी समुद्रापासून अंदमान व निकोबार द्वीपसमूहापर्यंत विस्तारलेल्या भारताच्या हवाई क्षेत्राचे आणि त्याच्याही पलीकडे विस्तारलेल्या भारताच्या राष्ट्रहितांचे सक्षमपणे रक्षण करत आहे. विविध देशांच्या हवाईदलांबरोबर होणाऱ्या संयुक्त युद्धसरावांच्या माध्यमातून आंतरखंडीय तैनातीमधील कौशल्य भारतीय हवाईदल दाखवून देत आले आहे. अशा निळ्या वर्दीतील आपल्या आकाशयोद्ध्यांना 89 व्या वर्धापन दिनी कडक सलाम...
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNice article Parag
उत्तर द्याहटवाThank you
हटवालेख माहितीपूर्ण आहे. आपल्या हवाई दलाविषयी वाचून त्याचा अभिमान वाटला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवालेख आवडला. हवाई दलाबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल.
उत्तर द्याहटवाKhuppp masta lihalay lekh mama
उत्तर द्याहटवा