अशी आमची गोबी होती...

 

एक महिन्याची गोबी

आमच्या गोबीला जाऊन या 21 ऑक्टोबरला 10 वर्ष झाली. जेमतेम पावणेदोन वर्षाच्या सहवासात ती माझी आणि सोसायटीतल्या सर्वांचीच लाडकी झाली होती. तिच्या आईचं म्हणजे पिटीचं मुख्य घर आमच्या सोसायटीतच होतं. पण नेहमीप्रमाणे बाळंतपणासाठी ती आमच्याकडेच येत होती. (तिच नाही गल्लीतल्या बऱ्याच मांजरींची हीच रीत झाली होती.) अशाच एका बाळंतपणाच्यावेळी 10 फेब्रुवारी 2010 ला पिटी आमच्या घरात आली आणि तीन पिल्लं झाली तिला त्यावेळी. म्हणजे प्रत्येकवेळी चारच होत होती, यावेळी तेवढी तीनच. त्या तीन पिल्लांपैकी एक गोबी होती. बाकीची पिल्लं ज्यांना-ज्यांना हवी त्यांनी नेली. गोबी मात्र 21 ऑक्टोबर 2011 पर्यंत माझ्याबरोबर राहिली. अगदी लाडूबाई झाली होती. खरंच खूप शहाणी होती ती. पण एका अपघातामुळे ती हे जग सोडून गेली. 


सात महिन्यांची असताना गोबीचं एका मोठ्या मांजरीशी भांडण झालं होतं. त्यात गोबीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अर्ध्या पायाला मोठी जखम झाली होती.
उपचारांनंतर ती बरी झाली.


मोठी झाल्यावर अशी खिडकीत बसलेली सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या सगळ्यांचं लक्ष हमखास वेधून घ्यायची. ओळखीचं कोण दिसलं की त्याला हाकही मारायची. मी ऑफिसमधून यायचो, तेव्हा गाडीचा आवाज ओळखून असेल तिथून पळत यायची.







घरी असलो की म्हणायची, तुझं काम नंतर कर मला असं लॅपटॉपची उशी करून झोपायला खूप आवडतं!



गोबीचं पहिलं बाळंतपण आणि शेवटचं. दोन मुली, एक मुलगा.


अशी आमची गोबी होती....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा