![]() |
| IL-78MKI of Indian Air Force |
भारतीय हवाईदलासाठी अमेरिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेलं KC-135 Stratotanker विमान २१ नोव्हेंबरला आग्र्याच्या हवाईतळावर उतरलं आहे. दोन्ही देशांमधल्या या विमानासंबंधीच्या करारानुसार हे टॅंकर विमान आता पुढची तीन वर्ष भारतात राहणार आहे. यातून भारतीय हवाईदलाची टॅंकर विमानांची तातडीची गरज काही अंशी भागली आहे. तरीही अशी व्यवस्था हवाईदलासाठी कायम फायदेशीर असेलच, याची खात्री देता येणार नाही.
आग्य्रात दाखल
झालेलं अमेरिकन हवाईदलातील (USAF) KC-135 Stratotanker भारतीय हवाईदल आणि नौदलाच्या विमानांमध्ये हवेत उडत असताना इंधन भरेल. परिणामी भारतीय हवाईदलाच्या विमानांचा
पल्ला आणि उड्डाणाच्या कालावधी वाढण्यास मदत होईल. भारतीय हवाईदलाच्या आणि नौदलाच्या प्रशिक्षण मोहिमांच्यावेळी हे विमान
वापरलं जाईल.
रशियाकडून २००३ मध्ये
विकत घेतलेली ६ IL-78MKI टॅंकर
विमानं सध्या भारतीय हवाईदलात कार्यरत आहेत. २००७ मध्ये हवाईदलानं आणखी ६ टँकर विमानांची मागणी केली होती, जी अजून अपूर्णच राहिली आहे. मधल्या काळात तीनवेळा टॅंकर विमानांच्या
खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण या प्रक्रियेत सहभागी झालेल्या विमानांची किंमत, स्पर्धात्मकता आणि
इतर तांत्रिक कारणं यावर संबंधित विमान कंपन्यांकडून स्पष्ट उत्तरं न मिळाल्यामुळं
ती प्रक्रिया प्रत्येकवेळी थांबवण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात, रशियावरील निर्बंध आणि विमानांचे सुटे
भाग मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळं IL-78MKI विमानांची उपलब्धता कमी झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम हवाईदल आणि नौदलाच्या लढाऊ आणि टेहळणी विमानांच्या
पल्ल्यावर होत आहे. या परिस्थितीतून
मार्ग काढण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून अमेरिकेकडून भाडेतत्त्वावर हे टॅंकर विमान
घेण्यात आलं आहे. सुरुवातीची
3 वर्ष संपल्यावर या कराराची मुदत आणखी 3 वर्षांनी वाढवता येऊ शकेल, अशी तरतूद
करण्यात आली आहे. अमेरिकेतली Metrea
Management कंपनी या विमानाचं नियमन आणि देखभाल
करणार आहे. त्याचबरोबर
या विमानाचे कर्मचारी, वैमानिकसुद्धा
ही कंपनी आणि अमेरिकन हवाईदलाचेच असणार आहेत. त्याचवेळी Il-78 विमानं भारतीय हवाईदलाच्या अन्य मोहिमांसाठी राखून ठेवली जाणार आहेत.
यातून Il-78
विमानांच्या उड्डाण तासांची बचत होईल आणि नवी टँकर विमानं हवाईदलात दाखल होईपर्यंत
Il-78 चा वापर सुरू
ठेवता येईल.
भारतीय हवाईदल आणि नौदलाच्या अनुक्रमे C-17 Globemaster-3 आणि P-8I Neptune विमानांव्यतिरिक्त इतर विज्ञानामध्ये हवेत उडत असताना इंधन भरण्यासाठी probe and drogue यंत्रणा वापरली जाते, तर सी-१७ आणि पी-८ साठी boom यंत्रणा वापरली जाते. KC-135 वर या दोन्ही यंत्रणा बसवलेल्या असल्यामुळं या विमानाच्या मदतीनं भारतीय हवाईदल आणि नौदलाच्या कोणत्याही विमानात हवेत उडत असताना इंधन भरणं शक्य होईल. Il-78 विमानात बूम यंत्रणा नसल्यामुळं त्यातून सगळ्याच विमानांमध्ये इंधन भरणं शक्य होत नाही.
#Stratotanker #IndianAirForce #Agra #USAF
H841.jpeg)
छान माहितीपूर्ण.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवा